पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात (Pune district) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना (Pimpri Corona) बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. शहरात गेल्या 24 तासात 45 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 34 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात (Recover) केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
शहरामध्ये गेल्या 24 तासात 7 हजार 096 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 45 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज पर्यंत शहरात 23 लाख 10 हजार 818 चाचण्यांपैकी 2 लाख 78 हजार 268 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 2 लाख 74 हजार 124 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या शहरात 356 अॅक्टिव्ह रुग्ण (active patient) आहेत यामध्ये 207 जणांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 149 जणांवर घरी उपचार सुरु आहेत. (Pimpri Corona)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मात्र यापूर्वी मृत्यू झालेल्या एका रुग्णाचा मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. हा रुग्ण शहराबाहेरील आहे. शहरात आजपर्यंत 4 हजार 519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शहातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 69 आणि 132 खासगी कोविड-19 लसीकरण (Vaccination) केंद्रावर 10 हजार 961 जणांना लस देण्यात आली. आजपर्यंत शहरात 28 लाख 51 हजार 187 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
Web Title :- Pimpri Corona | In the last 24 hours, 34 patients of ‘Corona’ were discharged in Pimpri Chinchwad. Find out other statistics
Bigg Boss 15 | धक्कादायक! ‘या’ कंटेस्टंटला सलमान खानने काढलं बिग बॉसच्या घराच्या बाहेर