मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात शनिवारी 854 नवीन कोरोना रुग्णांचे (Coronavirus in Maharashtra) निदान झाले आहे. तर 804 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच दरम्यान 11 जणांचा कोरोनामुळे (Coronavirus in Maharashtra) मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 96 हजार 733 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71 टक्के इतके झाले आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 340 रुग्णांचा कोरोनामुळे (Coronavirus in Maharashtra) मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज ओमायक्रॉनच्या (Omycron) 8 रुग्णांचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 48 इतकी झाली आहे. आतापर्यंत 28 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सापडलेल्या 8 रुग्णांमध्ये 4 रुग्ण मुंबई (Mumbai), 3 सातारा (Satara) आणि 1 पुणे (Pune) महापालिका हद्दीमधील आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 75 लाख 70 हजार 939 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 48 हजार 694 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण नमुन्यांपैकी राज्यात 9.84 टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 6 हजार 942 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात 80 हजार 039 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत तर 886 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.
Maharashtra reports 854 new cases, 804 recoveries & 11 deaths today. 6,942 active cases
As per the National Institute of Virology, 8 more Omicron cases in the state today – 4 patients from Mumbai Airport surveillance, 3 from Satara & 1 from Pune Municipal Corporation pic.twitter.com/0uZ0QXQuC2
— ANI (@ANI) December 18, 2021
Web Title :- Coronavirus in Maharashtra | Corona 854 new patients in state in last 24 hours, find out other statistics
Pune Crime | पुण्यातील संतापजनक घटना ! घरात घुसून 26 वर्षीय नवविवाहितेवर अत्याचार, प्रचंड खळबळ