बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अॅक्ट्रेस नुशरत भरूचा (Nushrat Bharucha) आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं कायमच चर्चेत येत असते. सोशलवर ती कायमच सक्रिय असते. नुशरत अनेकदा आपल्या बिकिनी लुकमुळंही चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा नुसरतनं चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
नुशरतनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये तिचा बोल्ड आणि हॉट लुक दिसत आहे. फोटोंमध्ये नुशरत
बोल्ड बिकिनीत दिसत आहे.
समुद्र किनारी पोज देणारी नुशरत तिची परफेक्ट फिगर फ्लाँट करतआहे. समोर आलेल्या माहितीनुसार तिचे हे फोटो गेल्या वर्षीचे मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे आहेत. परंतु तिनं पुन्हा ते सोशलवर शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
नुशरतचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.
नुशरतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती विकी कौशलचा भाऊ सनी कौशल सोबत हुडदंग सिनेमात काम करतना दिसणार आहे. अलीकडेच ती राजकुमार रावसोबत छलांग सिनेमात दिसली आहे. तिनं आयुष्मान खुरानाच्या ड्रिमगर्ल या सिनेमातही काम केलंय. कल किसने देखा, ताजमहाल, लव्ह सेक्स और धोका, तिनं प्यार का पंचनामा, तिनं प्यार का पंचनामा 2, सोनू के टीट्टू की स्वीटी असे तिचे काही सिनेमे सांगता येतील. प्यार का पंचनामा या सिनेमानं तिला खूपच लोकप्रियता मिळाली.
https://www.instagram.com/p/CI3AgH-hFVq/
https://www.instagram.com/p/CI3AYAzBwsh/
https://www.instagram.com/p/CI24j3tpxVp/