Nitin Gadkari On Sugarcane Farmers | ‘…तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल’; नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन– Nitin Gadkari on Sugarcane Farmers | भारतात ऊस उत्पादकांमध्ये (Sugarcane Farmers) वाढ झाली आहे मात्र ऊसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी, ऊस हे आळशी लोकांचं पीक असल्याचं म्हटलं होतं. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही याबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. (Nitin Gadkari on Farmers)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यंदाच्या वर्षी भारतात साखरेचं सर्वाधिक उत्पन्न घेण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये (International Market) साखरेची मागणी वाढल्याने भारतामधील साखरेला अधिक मागणी आहे कारण ब्राझीलमध्ये (Brazil) उत्पादन घटलं आहे. विक्रमी गाळपामुळे आमदार बबनराव शिंदे (MLA Babanrao Shinde) यांच्या चेहऱ्यावर हसू आहे मात्र हे फार काळ टिकणार नाही, कारण ऊसाचं वाढतं क्षेत्र हे धोक्याचं असल्याचं नितीन गडकरी (Nitin Gadkari on Sugarcane Farmers) म्हणाले.
ऊसाचं उत्पादन असंच वाढत गेले तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल. एकाच पिकाच्या मागे न जाता वेगवेगळी पिके घेऊन जास्तीत जास्त उत्पादन वाढवता येतं. कारखान्यांनी इथेनॉलच्या (Ethanol) निर्मितीवर भर द्यायला हवा, पुढच्या वर्षी ऊसाची यापेक्षा बिकट अवस्था असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, देशात सर्वात जास्त ऊसाचं गाळप होणारा कारखाना म्हणून सोलापूरमधील (Solapur)
माढा (Madha) तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे हा कारखाना (Vitthalrao Shinde Sugar Factory) ओळखला जातो.
यंदाही लाख टन ऊसाचं गाळप झाल्याचं बबनराव शिंदे यांनी सांगितलं. ब्राझीलमधील कारखाने बंद आहेत
म्हणून साखरेला दर आहे नाहीतर 22 रूपयेही भाव मिळाला नसता, असं गडकरी म्हणाले.
Web Title :- Nitin Gadkari On Sugarcane Farmers | BJP leaders and union minister nitin gadkari expresses concern over excess sugarcane production
हे देखील वाचा :
Pune Crime | बिल्डींगचे वेळेत काम पूर्ण न करता मोफा कायद्याचे उल्लंघन, बांधकाम व्यावसायिकावर FIR
Comments are closed.