Solapur-Hyderabad Highway News | सोलापूरमध्ये पुण्यातील कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू; 5 जण गंभीर जखमी

सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन– Solapur Accident News | सोलापूर-हैदराबाद महामार्गावर थांबलेल्या ट्रकला भरधाव वेगात जाणाऱ्या कारची पाठीमागून धडक बसून भीषण अपघात (Solapur-Hyderabad Highway News) झाला. हा अपघात सोलापूर-हैदराबाद रोडवरील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती (Shri Siddheshwar Krishi Bazar Samiti Solapur) परिसरात आज (सोमवार) दुपारी दोनच्या सुमारास झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी (Seriously Injured) झाले आहेत. जखमी झालेल्या पाच जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांची आणि जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. (Solapur-Hyderabad Highway News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पाठीमागून ट्रकवर जाऊन आदळली. ही कार पुण्याहून (Pune) निघाली होती. हा अपघात एवढा भीषण (Solapur-Hyderabad Highway News) होता की कार अर्ध्यापर्यंत चक्काचूर झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी (Solapur Traffic Police) घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालक, त्याच्या बाजूला बसलेला आणि पाठिमागे असलेल्या अशा चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इनोव्हा कारचा अपघात झाला आहे.
सर्व्हिस रोडवर थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या इनोव्हा कारची जोरदार धडक बसली.
दोन क्रेनच्या सह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.
हे देखील वाचा :
How To Care Heart In Summers | उन्हाळ्यात आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी?
Pune Crime | हिंजवडी आणि भोसरीत महिलांच्या विनयभंगाच्या दोन घटना
Comments are closed.