Pune Crime | IPL सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या परेश भूत, प्रफुल्ल कलावटे, अक्षय ठोंबरे आणि महेश क्षिरसागरला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | सध्या सुरु असलेल्या आयपीएल सामन्यावर (IPL Match) सट्टा (IPL Cricket Betting) घेणाऱ्या चार जणांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या (Pune Police Crime Branch) पथकाने छापा टाकून अटक (Arrest) केली. परेश मोहन भूत (Paresh Mohan Bhoot), प्रफुल्ल नरेंद्र कलावटे (Prafulla Narendra Kalavate), अक्षय पांडुरंग ठोंबरे (Akshay Pandurang Thombre), महेश राजेंद्र क्षिरसागर (Mahesh Rajendra Kshirsagar) यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) आयपीसी IPC 420, 465, 468, 471, 34 सह महाराष्ट्र जुगार कायदा (Maharashtra Gambling Act) आणि भारतीय टेलिग्राफ अॅक्ट (Indian Telegraph Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात (Pune Crime) आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रविवारी (दि.24) मुंबई विरुद्ध लखनऊ (Mumbai Indians Vs Lucknow Super Giants) LSG Vs MI या दोन संघामध्ये आयपीएलचा क्रिकेट सामना झाला. या सामन्यावर वडकी येथे सट्टा घेत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने छापा टाकून परेश मोहन भूत (वय-37 रा. फुलवाला चौक, गुरुवार पेठ, पुणे), प्रफुल्ल नरेंद्र कलावटे (वय-37 रा. गुरुवार पेठ) यांना सट्टा घेताना आणि अक्षय पांडुरंग ठोंबरे (वय-26 रा. शिवराधानगर, वडकीनाला, पुणे), महेश राजेंद्र क्षिरसागर (वय-23 रा. वडकीनाला, पुणे) यांना सट्टा खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. (Pune Crime)
पोलिसांनी सट्टा खेळण्याकरिता वापरलेले 10 मोबाईल हँडसेट, कॅलक्यूलेटर, मार्कर पेन, नोदवही असा एकूण 67 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी सट्टा घेण्यासाठी सिमकार्ड खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane),
सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil), पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले,
नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे,
सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.
Web Title :- Pune Crime | Pune City Police Crime Branch arrests Paresh Bhoot, Praful Kalawate, Akshay Thombre and Mahesh Kshirsagar for betting on IPL matches
हे देखील वाचा :
How To Care Heart In Summers | उन्हाळ्यात आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी?
Pune Crime | हिंजवडी आणि भोसरीत महिलांच्या विनयभंगाच्या दोन घटना
Comments are closed.