Pune Crime | बिल्डींगचे वेळेत काम पूर्ण न करता मोफा कायद्याचे उल्लंघन, बांधकाम व्यावसायिकावर FIR

Pune Crime | Failure to complete building work on time, violation of MoFA Act, FIR against builder

सांगवी : बहुजननामा ऑनलाइनPune Crime | बिल्डींगचे काम वेळेत पूर्ण करुन ॲग्रीमेंटनुसार ताबा देणे बंधनकारक असतान मोफा कायद्याचे (Mofa Act) उल्लंघन करणाऱ्या बिल्डरवर (Builder) सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. कमारअली हमीद शेख (Kamarali Hameed Shaikh) असे गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी शेख यांच्यावर आयपीसी IPC 420,409 मोफा अधिनियम 3,4,5,6,8,13,14(1)(2),17 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

याबाबत आशीष भागवतसिंह तोमर Ashish Bhagwatsingh Tomar (वय-46 रा. सुदर्शन पॅराडाईज, विशाल नगर, पिंपळे निलख-Pimple Nilakh) यांनी रविवारी (दि.24) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कमारअली शेख (रा. शंकर मंदिराजवळ, कोंढवा-Kondhwa) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येथील पॅन्टागॉन पर्ल (Pentagon Pearl) येथे 23 जून 2019 पासून 24 एप्रिल 2022 या कालावधीत घडला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कमारअली शेख हे पिंपळे गुरव (Pimple Gurav) येथील पॅन्टागॉन पर्लचे प्रमोटर (Promoter), डेव्हलपर (Developer) आणि बिल्डर आहेत. फिर्यादी आणि आरती दिनेश प्रसाद (Aarti Dinesh Prasad) यांना पॅन्टागॉन पर्ल या बिल्डींगचे काम पूर्ण करुन ॲग्रीमेंटनुसार (Agreement) ताबा देणे बंधनकारक होते. मात्र, आरोपीने वेळेत काम पूर्ण केले नाही तसेच ताबा न देता मोफा कायद्याचे उल्लंघन केले. याशिवाय ॲग्रीमेंटमधील अटी व शर्तींचे उल्लंघन केले. आरोपी शेख यांनी 23 जून 2019 पासून आजपर्यंत प्रत्येक महिन्याचे भाडे देण्यास नकार देऊन दोघांची आर्थिक फसवणूक (Cheating) केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल तांबे (Police Inspector Sunil Tambe) करीत आहेत.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | Failure to complete building work on time, violation of MoFA Act, FIR against builder

 

हे देखील वाचा :

Solapur-Hyderabad Highway News | सोलापूरमध्ये पुण्यातील कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू; 5 जण गंभीर जखमी

Pune Crime | IPL सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या परेश भूत, प्रफुल्ल कलावटे, अक्षय ठोंबरे आणि महेश क्षिरसागरला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

How To Care Heart In Summers | उन्हाळ्यात आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी?