पुणे : बहुजननामा ऑनलाईन – यंदा पुण्यात चांगलाच पाऊस पडत असल्याने सगळी कडे पाणीच पाणी आहे. तर पुण्यातील धरणे १०० % भरून वाहत आहेत. अशातच ठिक ठिकाणी पाणी शिरल्याने आणि धरणातील पाणी नदीला सोडल्याने पुणे शहरातील काही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. नागरिकांच्या सतर्कतेसाठी हा निर्णय घेतला असून या पुलांऐवजी पर्यायी मार्गाचा सोय करण्यात आला आहे. आज घराच्या बाहेर पडण्याआधी जाणून घ्या कोणते पूल बंद असणार आणि पर्यायी मार्ग कोणता असेल.
औंधगाव ते डांगे चौक मार्ग दोन्ही बाजूंनी बंद असून या मार्गावरील राजीव गांधी पूल बंद करण्यात आला आहे. स्पायसर कॉलेज ते जुनी सांगवी, नवी सांगवी या मार्गावरील जुनी सांगवी पुलांवरील वाहतूक दोन्ही बाजूनी बंद करण्यात आले आहे. भाऊ पाटील रस्ता, दापोडी गाव मार्गावरील दापोडी पूल बंद असणार आहे. खडकी बाजार ते साप्रस मार्गावरील जुना होळकर पूल बंद राहणार आहे. डेक्कन येथील भिडे पुलावरील वाहतूकही बंद करण्यात आले आहे. टिळक पूल ही बंद असणार आहे.
पुणे शहरातून पिंपरी- चिंचवडकडे जाण्यासाठी वाकडेवाडी मार्गे जुना पुणे – मुंबई मार्गाचा किंवा बाणेर रस्त्यावरून राधा चौकातून वाकड मार्गाचा वापर करावा. तसेच औंधमधील शिवाजी विद्यामंदिर शाळेपर्यंत पाणी आल्यामुळे हा मार्ग बंद असल्याने नागरिकांनी या भागात जाण्याचे टाळावे. असे आवाहन पालिकेच्या औंध क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्तांनी केले आहे. त्याच बरोबर हवामान खात्याने वर्तविलेल्या अतिवृष्टी शक्यतेमुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आज मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी देखील सुटी राहणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली आहे.
- पावसाळ्यात घ्या वेगवेगळ्या प्रकारचा चहा, होतील ‘हे’ फायदे
- थंडीच्या दिवसातही ओठ गुलाबी, सुंदर राहण्यासाठी ‘हे’ ६ उपाय, जाणून घ्या
- ‘अपेंडिक्स’ आजाराचे असू शकतात ‘हे’ ८ संकेत, याकडे करु नका दुर्लक्ष
- ‘किडनी स्टोन’चा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ टाळा
- काही मिनिटांमध्ये उतरेल ताप, करुन पाहा ‘हे’ ११ सोपे उपाय
- जास्त किंवा कमी झोपेमुळे आजारी पडू शकता, ‘हे’ ४ नियम आवश्य पाळा
- शरीराच्या ‘या’ ८ भागांवर सूज आल्यास करु नका दुर्लक्ष, गंभीर आजारांचे संकेत