नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीमधील जाकीरनगर परिसरातील एका बिल्डिंगला लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यु झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे दिल्ली हादरली आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीषण आगीत २ पुरुष, २ महिला आणि २ मुलांचा मृत्यू झाला आहे.
Delhi: Death toll rises to 6 in the fire that broke out in a multi-storey building in Zakir Nagar late last night. https://t.co/iR9f9YxmEk
— ANI (@ANI) August 6, 2019
जाकीरनगर परिसरातील या बिल्डिंगमध्ये एकूण १३ फ्लॅट आहेत. मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास बिल्डिंगच्या विजेच्या मीटर बोर्डजवळ ‘शार्ट सर्कीट’ झालं आणि सगळीकडे आग पसरली. त्यामध्ये जवळपास सर्वच फ्लॅटमधील वायरिंग जळून आतील सामानाना आग लागली. झोपेत असल्याने याबाबत सुरुवातीला कोणाला काही एक समजले नाही. त्यामुळे काही जणांचा झोपेतच भाजून आणि गुदमरून मृत्यु झाला. मीटर बोर्डला लागलेल्या भीषण आगीमुळे पार्किंगमध्ये पार्क केलेल्या ७ कार आणि ८ दुचाकी भस्मसात झाल्या आहेत. पोलिसांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यातील काही जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. फ्लॅटमध्ये मिळालेले मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनाला पाठवून दिले आहेत.
घटनेची महिती मिळल्यानंतर अग्निशमन दल, पोलीस अधिकारी आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
- पावसाळ्यात घ्या वेगवेगळ्या प्रकारचा चहा, होतील ‘हे’ फायदे
- थंडीच्या दिवसातही ओठ गुलाबी, सुंदर राहण्यासाठी ‘हे’ ६ उपाय, जाणून घ्या
- ‘अपेंडिक्स’ आजाराचे असू शकतात ‘हे’ ८ संकेत, याकडे करु नका दुर्लक्ष
- ‘किडनी स्टोन’चा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ टाळा
- काही मिनिटांमध्ये उतरेल ताप, करुन पाहा ‘हे’ ११ सोपे उपाय
- जास्त किंवा कमी झोपेमुळे आजारी पडू शकता, ‘हे’ ४ नियम आवश्य पाळा
- शरीराच्या ‘या’ ८ भागांवर सूज आल्यास करु नका दुर्लक्ष, गंभीर आजारांचे संकेत