उत्तराखंड : वृत्तसंस्था – उत्तराखंड मधील टिहरी गढवाल जिल्हयात स्कूलबस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 7 शाळकरी विद्यार्थी जागीच ठार झाले आहेत. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी घडली असून स्कूलबसमध्ये एकूण 18 विद्यार्थी होते.
जखमी झालेल्यांना तात्काळ जवळील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधिकार्यांसह शाळेच्या प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Uttarakhand: 7 feared dead after a school bus, carrying 18 children, rolled down a gorge in Kangsali of Tehri Garhwal today. The injured are being taken to a hospital. pic.twitter.com/Gx3HsKsTLl
— ANI (@ANI) August 6, 2019
एनडीआरएफीचं पथक देखील घटनास्थळी पोहचल आहे. मदत कार्य युध्दपातळीवर चालू आहे. दरीत कोसळलेल्या स्कूलबसला वर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. टिहरीच्या कांगसाली येथे असलेल्या दरीत स्कूलबस कोसळली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी, पालकांनी आणि शाळेतील शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
दरीत कोसळून झालेल्या अपघातात 7 विद्यार्थी जागीच ठार झाले आहेत तर इतर दोन विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. स्कूलबसमध्ये एकूण 18 विद्यार्थी होते. काहीजण जखमी झाले असून त्यांना हॉस्पीटीलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
- पावसाळ्यात घ्या वेगवेगळ्या प्रकारचा चहा, होतील ‘हे’ फायदे
- थंडीच्या दिवसातही ओठ गुलाबी, सुंदर राहण्यासाठी ‘हे’ ६ उपाय, जाणून घ्या
- ‘अपेंडिक्स’ आजाराचे असू शकतात ‘हे’ ८ संकेत, याकडे करु नका दुर्लक्ष
- ‘किडनी स्टोन’चा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ टाळा
- काही मिनिटांमध्ये उतरेल ताप, करुन पाहा ‘हे’ ११ सोपे उपाय
- जास्त किंवा कमी झोपेमुळे आजारी पडू शकता, ‘हे’ ४ नियम आवश्य पाळा
- शरीराच्या ‘या’ ८ भागांवर सूज आल्यास करु नका दुर्लक्ष, गंभीर आजारांचे संकेत