नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील दोषींना येत्या २० मार्चला होणाऱ्या फाशीपासून बचाव करत दोषींमधील मुकेश सिंहने नवीन शक्कल चालवली असून त्याने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. मुकेशने आपल्या वकिलांद्वारे हायकोर्टात याचिका दाखल केल्याचा दावा केला आहे कि १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री घटनेदरम्यान तो हजर नव्हताच. याअगोदरच त्याने मंगळवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात मुकेशची याचिका फेटाळली आहे, ज्यात फाशीच्या शिक्षेला टाळण्याची मागणी केली होती.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी अर्ज फेटाळत त्याचे वकील एमएल शर्मा यांना बरखास्त केले होते. वकील एमएल शर्मा यांच्याकडून एक अर्ज दाखल केला गेला होता, ज्यात दावा केला गेला होता कि अभियोजन पक्षाने जाणूनबुजून काही कागदपत्रांना खोटे छापत त्याला फसवले होते. यावर न्यायालयाने म्हटले की, ‘योग्य देखरेखीच्या प्रॅक्टिससाठी दोषींच्या वकिलाचे आचरण बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या निदर्शनास आणले पाहिजे.
वकिलांनी कोर्टासमोर केवळ खोटे विधानच केले नाही, तर त्यांची कर्तव्ये पार पाडण्यात ते खूप अपयशी ठरले आहेत.’ मुकेशने दावा केला होता कि १६ डिसेंबर २०१२ ला तो राष्ट्रीय राजधानीमध्ये नव्हता. त्याला राजस्थानमधून अटक केले गेले होते. घटनेच्या एक दिवसानंतर १७ डिसेंबर २०१२ ला दिल्लीला आणले गेले होते. तर एकीकडे अभियोजकांनी सांगितले की, अर्ज केवळ डेथ वॉरंटला प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे.