बहुजननामा ऑनलाइन टीम – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (इपीएफओ) दिवाळीपूर्वी 8.5 टक्केच्या व्याजाचा पहिला हप्ता पीएफ अकाऊंटमध्ये(PF account) जमा करू शकते. सप्टेंबरमध्येच इपीएफओच्या केंद्रीय बोर्डाने म्हटले होते की, 31 मार्च 2020 पर्यंत संपत असलेल्या आर्थिक वर्षासाठी व्याज या वर्षाच्या अखेरपर्यंत दिले जाईल. हे व्याज अगोदर 8.15 टक्के आणि नंतर 0.35 टक्केच्या दराने दोन भागात वाटले जाईल.
* कुठून व्याज देणार इपीएफओ
कोरोना व्हायरस महामारीमुळे इपीएफओच्या कमाईवर वाईट परिणाम पडला होता. यानंतर केंद्रीय बॉडीने व्याजदराचे रिव्ह्यू केले. रिव्ह्यूनंतर बोर्डाने सरकारला व्याजदर 8.5 टक्के ठेवण्याची शिफारस केली होती. कामगार मंत्रालयाने याबाबत माहिती दिली होती. वक्तव्यात म्हटले होते की, 8.50 टक्के व्याजात 8.15 टक्के कर्जातून होणार्या कमाईतून येतील, तर 0.35 टक्केची रक्कम ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) च्या विक्रीतून जमवण्यात येईल.
* त्वरित सेटलमेंटसाठी इपीएफओने उचलले पाऊल
कोरोना व्हायरस महामारी संकट पहाता कोविड-19 अॅडव्हान्स आणि आजारासंबंधी क्लेम्सचे सेटलमेंट तात्काळ केले गेले आहे. यासाठी इपीएफओने दोन्ही कॅटेगरीत ऑटो मोडद्वारे सेटलमेंट प्रोसेस सादर केली होती. या अंतर्गत बहुतांश क्लेमचा अवघ्या 3 दिवसात निपटारा करण्यात आला. सामान्यपणे कायदेशीर प्रकारे यासाठी 20 दिवसांचा वेळ लागतो.
* एसएमएसने जाणून घ्या पीएफ खात्याचा बॅलन्स
इपीएफओकडे तुमचा यूएएन रजिस्टर्ड असेल तर लेटेस्ट योगदान आणि पीएफ बॅलन्सची माहिती एका मॅसेजद्वारे मिळेल. यासाठी 7738299899 वर हे लिहून पाठवावे लागेल – एझऋजकज णअछ एछॠ शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत.
यासाठी तुमचे यूएएन बँक अकाऊंट, पॅन आणि आधारशी लिंक्ड असावे.
* ईपीएफओची वेबसाइट
युनिफाईड पोर्टलच्या ठिकाणी यूजर आता पीएफचे पासबुक एका वेगळ्या वेबसाइटवर सुद्धा पाहू शकतात. ट्रान्सफर सारख्या सेवांसाठी युनिफाईड पोर्टलचा वापर अजूनही केला जाऊ शकतो.
पोर्टलवर पीएफ पासबुक पाहण्यासाठी आवश्यक आहे की, तुमचे पीएफ अकाऊंट युनिव्हर्सल अकाऊंट नंबरशी टॅग असावे.
* ईपीएफओ अॅपद्वारे –
ईपीएफओचे एम-सेवा अॅप तुम्ही गुगलच्या प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.
एकदा अॅप डाऊनलोड झाल्यानंतर मेंबरवर क्लिक करून तुम्ही बॅलन्स/पासबुक सेक्शनमध्ये जाऊ शकता. यानंतर तुम्हाला यूएएन आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकावा लागेल.
* मिस्ड कॉलद्वारे
जर तुम्ही यूएएन पोर्टलवर रजिस्टर्ड आहात तर तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या.
यानंतर ईपीएफओकडून एक मॅसेज मिळेल ज्यामध्ये तुम्हाला पीएफ खात्याची डिटेल तुम्हाला मिळेल. येथे सुद्धा जरूरी आहे की यूएएनकडून बँक अकाऊंट, पॅन आणि आधार लिंक्ड असावे.