‘बुरे काम का बुरा नतीजा, सुन भाई चाचा, आ भतीजा’ ! बारामतीतच मुख्यमंत्री फडणवीसांची पवारांवर ‘बोचरी’ टीका

बारामती : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज बारामतीत पोहोचली होती. यावेळी सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये राहायला कोणीच तयार नाही. बुरे काम का बुरा नतीजा, सुन भाई चाचा, आ भतीजा असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पवारांना टोला लगावला.
सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “बारामतीत माझ्या स्वागत सभेचा राष्ट्रवादीने एवढा धसका घेतला की, कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या साऊंड सिस्टीम आणि फलकांवर हरकत घेतली. ही सभा केवळ स्वागत सभा राहिली नसून महासभेत परावर्तित केल्याबद्दल मी बारामतीकरांचे आभार मानतो” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी बारामतीकरांचे आभार मानले.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दुपारी 4 वाजता 3 हत्ती चौकात पोहोचली. यावेळी बोलताना पवारांवर फारशी टीक न करता मुख्यमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षातील केंद्र व राज्य सरकारच्या कामाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडण्याला प्राधान्य दिले. मुख्यमंत्र्यांच्या या बारामतीमधील महाजनादेश यात्रेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, बाळा भेगडे, खा. अमर साबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.
Comments are closed.