बहुजननामा ऑनलाईन – लवकरच एक चकित करणारी घटना अवकाशात घडणार आहे. दोन मोठे धुमकेतू पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकत आहेत. वैज्ञानिकही या धुमकेतूंवर २००० आणि २०१० सालापासून लक्ष ठेवून आहेत. हे दोन मोठे धूमकेतू पृथ्वीकडे वेगाने वाटचाल करीत असले तरी ते पृथ्वीवर आदळणार नाहीत. परंतु ते पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. या धूमकेतूंचा आकार बुर्ज खलिफाइतकाच मोठा असल्याचे अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने म्हटले आहे.
बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. अशा परिस्थितीत आपण अंदाज करू शकतो की, हा धूमकेतू आकाराने किती मोठा असून शकतो. तथापि, पहिल्यांदाच कोणता धूमकेतू पृथ्वीच्या इतक्या जवळून जाणार आहे. २००० मध्ये नासाला पहिला धूमकेतू सापडला होता तर दुसरा धूमकेतू २०१० मध्ये सापडला होता.
या धूमकेतूंपासून पृथ्वीला कोणताही धोका असणार नाही अशी माहितीही नासाने दिली आहे. ते पृथ्वीपासून सुमारे ३.५ दशलक्ष मैल अंतरावरून निघून जातील. नासाच्या मते सौर यंत्रणा तयार झाल्यापासून हे धूमकेतू असेच होते. दरम्यान, अजून एक धूमकेतू सूर्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत असून तो नुकताच सापडला आहे. तथापि, हा धूमकेतू पृथ्वीपासून खूप दूरुन निघून जाईल. सूर्याशी टक्कर झाल्यानंतर तो पुन्हा एकदा अवकाशात जाईल. अशी माहितीही नासाने कळविली आहे.
Happening soon: two medium-sized asteroids will safely pass Earth! Both objects are passing by about 3.5 million miles – nearly 14 times the distance between Earth & the Moon.
Find out how @asteroidwatch is tracking near-Earth asteroids: https://t.co/eSYWB1MU28 pic.twitter.com/vwC7OkTT22
— NASA (@NASA) September 12, 2019