धुळे : बहुजननामा ऑनलाईन – समाजकंटकांनी पुतळ्यांची तोडफोड करण्याचं लोण कमी न होता दिवसेंदिवस वाढतच चालले आहे धुळे येथील मोरदड तांडा गावात काही अज्ञात समाजकंटकांनी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यातील संविधान बचाव कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. संविधान बचाव कृती समितीच्या वतीने समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काही अज्ञात समाजकंटकांनी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या घटनेमुळे गावात तसेच आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. या घटनेचे पडसाद सोमवारी धुळे शहरात उमटले.धुळ्यातील संविधान बचाव कृती समितीच्यावतीने यासंदर्भात निदर्शने करून समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, समाजकंटकांनी केलेल्या या घाणेरड्या कृत्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संविधान बचाव कृती समितीच्यावतीने देण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक राजू भुजबळ यांना निवेदन देण्यात आले.