सातारा : बहुजननामा ऑनलाईन – साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी नुकताच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करतानाच अट ठेवली होती की, साताऱ्याची लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेतसोबत घ्यावी. परंतु साताऱ्याची विधानसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नाही. कारण निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते उदयनराजेंविरोधात ‘सज्ज’
निवडणूक आयोगाने नुकतीच पत्रकार परिषद घेत विधानसभेची घोषणा केली आहे. यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा झालेली नाही. असे असले तरी उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीने आताच कंबर कसली आहे. उदयनराजेंची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालाचली सुरु आहेत. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीतून 4 दिग्गजांची नावे चर्चेत आहेत.
उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. शशिकांत शिंदे यांचा आपल्या कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळेच त्यांचं नाव आघाडीवर आहे अशी माहिती आहे. याशिवाय राष्ट्रवादीतून अविनाश मोहिते, नितीन लक्ष्मणराव पाटील, श्रीनिवास पाटील इत्यादी नावांचीही चर्चा आहे.
उदयनराजेंना पराभवाची भीती?
खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधासभेसोबतच साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. पोटनिवडणुकीत जर पराभव झाला तर राज्यसभेवर नियुक्ती करावी अशी अट भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता उदयनराजेंना पराभवाची भीती आहे का अशी चर्चा रंगताना दिसत आहेत.
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा