बहुजननामा ऑनलाइन टीम – सुंदर आणि डागविरहित त्वचा प्रत्येक तरुणीला हवी असते. त्यासाठी तरुणी महागड्या ब्युटी प्रोडक्ट्चा वापर करतात. पण तुम्हाला माहिती आहे का ? भात करण्यापूर्वी तांदूळ ज्या पाण्यात धुतला जातो. त्या पाण्याचा वापर तुम्ही आपल्या त्वचेसाठी करु शकता. कारण या पाण्यात त्वचेसाठी पोषण असलेल्या कित्येक घटकांचा समावेश असतो. त्वचा सुंदर आणि निरोगी दिसावी म्हणून कित्येक महिला तांदळाच्या पाण्याचा वापर करतात.
तांदळाच्या पाण्यापासून क्रीम, लोशन आणि मॉइश्चराइझर यांसारखे महागडे प्रोडक्ट तयार होतात. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आणि नैसर्गिक उपचार म्हणून तुम्ही घरच्या घरी सुद्धा तांदळाचे पाणी वापरुन मॉइश्चराइझर तयार करु शकता. चला तर मग जाणून घेऊया त्याचे फायदे, बनवण्याची पद्धत, आणि वापर.
तांदळाचे पाणी आणि त्याचे फायदे
अनेक जण तांदूळ धुतल्यावर त्याचे पाणी फेकून देतात. मात्र तुम्ही ही चूक करु नका. कारण याचे फायदे जाणून घेतल्यावर कोणी सुद्धा तांदळाचे पाणी फेकून देण्याची चूक करणार नाही. तसेच तुम्ही स्वतःहूनच आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये त्याचा समावेश कराल, यामध्ये शंका नाही.
अद्भुत मॉइश्चराइझर आणि टोनर
तांदळाचे पाणी हे एक अद्भुत असे मॉइश्चराइझर असल्याने ते आपल्या चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत करतात. तसेच त्वचेवरील हार्पर पिगमेंटेशन, काळे डाग किंवा सन टॅनिंग देखील दूर होते.
कोलेजन वाढण्यास मदत मिळू शकते
तांदळाच्या पाण्याचा नियमित वापराने त्वचा मऊ आणि चमकदार होते. तसेच या नैसर्गिक उपचाराचे त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तांदळात असलेले घटक आपली त्वचा पुनरुज्जीवित करतात आणि नवीन पेशींच्या वाढीसाठी उत्तेजन देतात. तांदळाच्या पाण्याचा नियमित वापर केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. आणि औषधी गुणधर्म त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करतात.
धूळ, माती, प्रदूषणापासून संरक्षण
तांदळात असलेले फेरुलिक अॅसिड नावाचे अँटी ऑक्सिडेंट आपल्या त्वचेवर येणाऱ्या धूळ, माती, प्रदूषण आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते. धूळ, मातीच्या कणांमुळे आपल्या त्वचेचं नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे.
मॉइश्चराइझर तयार करण्याची पद्धत
एका हवाबंद डब्यात तांदूळ आणि दोन कप पाणी भरुन ठेवा. चमच्याच्या साहाय्याने तांदूळ आणि पाणी मिक्स करत राहावा. परत डब्याला झाकण लावा. दोन तास तांदूळ पाण्यात भिजत ठेवल्यानंतर तुम्हाला पाण्याचा रंग पांढरा झाल्याचं दिसेल. त्यानंतर चमच्याने तांदूळ पुन्हा मिक्स करा म्हणजे त्यातील पोषण तत्व पाण्यात एकत्र होतील.
कसा करायचा वापर
तांदळाचे पाणी कापसाच्या साहाय्याने आपल्या चेहऱ्यावर दोन मिनिटांसाठी लावा. चेहरा सुकल्यावर तांदळाचे पाणी पुन्हा चेहऱ्यावर लावा. तांदळाच्या पाण्यातील पोषण तत्वांचा खोलवर पुरवठा होतो. त्यामुळे त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळते आणि त्वचा मऊ होते. या पद्धतीचा वापर केल्याने बाजारातील टोनर वापरण्याची गरज भासणार नाही. तसेच तांदळाच्या पाण्यापासून तयार केलेलं हे मॉइश्चराइझर हात, मान आणि अन्य अवयवांना सुद्धा वापरु शकता.