बहुजननामा ऑनलाइन टीम – आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती घसरल्यामुळे देशांतर्गत बाजारात किंमती खाली आल्या आहेत. चार दिवसांच्या वाढीनंतर, दिल्ली बुलियन मार्केटमध्ये 99.9% शुद्ध सोन्याचे भाव शुक्रवारी दहा ग्रॅम 52500 रुपयांवर घसरले. त्याचबरोबर मागणी कमी झाल्याने चांदीच्या दरात एक किलो 990 रुपयांनी घसरण झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे कि, येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढू शकतो . कारण टेक्निकल चार्टवर त्याच्या कमकुवतपणाचे संकेत आहेत. दरम्यान, जर ते 1935 डॉलर प्रति औंसच्या वर राहिले तर यास गती मिळू शकेल.
नवीन सोन्याच्या किंमती – सलग चौथ्या दिवशी वाढ झाल्यानंतर शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घट दिसून आली आहे. 99.9 टक्के असलेल्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,643 रुपयांवरुन 52,452 रुपयांवर आली आहे. या काळात दर दहा ग्रॅम किमतींमध्ये 191 रुपयांनी घट झाली आहे.
नवीन चांदीच्या किंमती – सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीही खाली आल्या आहेत. शुक्रवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये एक किलो चांदीची किंमत दहा ग्रॅम 70,431 रुपयांवरुन 69,950 रुपयांवर आली. या काळात किंमती 990 रुपयांनी घसरल्या आहेत.
अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती खाली आल्या असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, मागणी कमी होत आहे.