नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया,एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior citizen) सुरु केलेली अधिक व्याजदराची एक विशेष मुदतठेव योजना 30 जून 2021 रोजी बंद होणार आहे. या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च होती. ती 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना (Senior citizen) या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त हा महिना बाकी आहे.
या सर्व बॅंकानी ज्येष्ठ नागरिकांसाठी मे 2020 मध्ये एक खास योजना आणली होती.
ठराविक कालावधीसाठी असलेल्या मुदत ठेव योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या व्याजदरापेक्षा अर्ध्या टक्क्याहून अधिक व्याज दर दिला जात आहे.
त्यामुळे सर्वसाधारण ग्राहकाला मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा एक टक्का अधिक व्याज ज्येष्ठांना मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या या योजनेची मुदत वाढविल्याने यापूर्वी गुंतवणूक करू न शकलेल्या अनेक ज्येष्ठांना याचा लाभ घेण्याची संधी निर्माण झाली आहे.
1) स्टेट बँक : सध्या SBI च्या 5 वर्षांच्या मुदतीसाठी सामान्य नागरिकांना 5.4 टक्के व्याज देते.
मात्र एखाद्या ज्येष्ठाने विशेष मुदतठेव योजनेअंतर्गत गुंतवणूक केली तर त्याला 6.20 टक्के दराने व्याज मिळते.
2) एचडीएफसी बँक : एचडीएफसी बँक ज्येष्ठांसाठी आणलेल्या विशेष मुदतठेव योजनेवर सर्वसाधारण व्याजदरापेक्षा पाऊण टक्का (0.75) अधिक व्याज देते.
बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडीअंतर्गत एखाद्या ज्येष्ठाने ठेव ठेवल्यास त्याला 6.25 टक्के व्याजदर मिळेल.
3) बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदाच्या विशेष मुदतठेव योजनेअंतर्गत 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्के व्याजदर मिळेल.
4) आयसीआयसीआय बँक : या बँकेने ज्येष्ठासाठी आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स ही विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 6.30 टक्के व्याज दर मिळतो.
कृपया हे देखील वाचा:
कळंबमध्ये वॉचमनचा गोळ्या झाडून खून, परिसरात प्रचंड खळबळ
औरंगाबादमध्ये कुख्यात गुंडाची साडूकडूनच ‘गेम’, मित्राच्या मदतीनं केला खेळ ‘खल्लास’
राज्यात 5 टप्प्यात Unlock ! नियमावली जाहीर, तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात, जाणून घ्या
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नवं ट्वीट, शेअर केला ‘हा’ फोटो