औरंगाबादमध्ये कुख्यात गुंडाची साडूकडूनच ‘गेम’, मित्राच्या मदतीनं केला खेळ ‘खल्लास’
औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – कुख्यात गुंडाची (infamous goon) धारदार शस्त्राने भोकसून हत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमधून समोर आली आहे. शहरातील शहागंज मंडीत शुक्रवारी (दि. 4) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पैशाच्या देवाण घेवाणीतून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. जमीर खान शब्बीर खान उर्फ जम्या (वय 25) असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर चोरीचे अन् घरफोडीचे अनेक गंभीर गुन्हे होते. याप्रकरणी सीटी चौक पोलिसांनी मृत जम्याचा साडू शोहेब खानला अटक केली आहे.
सीटी चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसापूर्वी पैशाच्या देवाणघेवाणीतून मृत जमीर खान आणि त्याचा साडू आरोपी शोहेब खान यांच्यात वाद झाला होता.
दरम्यान शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मृत जमीरखान शहागंज मंडीतील चंद्रसागर जैन धर्मशाळेच्या समोर थांबला होता.
त्यावेळी आरोपी शोहेब खान आपल्या अन्य एका मित्रासोबत त्याठिकाणी आला.
त्यावळी शोहेबने पैशाच्या देवाण घेवाणीतून जमीरसोबत पुन्हा वाद घातला.
हा वाद विकोपाला जाताच, आरोपीने आणि त्याच्यासोबतच्या मित्राने धारदार शस्त्राने जमीरवर सपासप वार केले.
या हल्ल्यात छाती, पोट, मांडीवर वार झाल्याने जमीर जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला.
त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून धूम ठोकली.
घटनास्थळी असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी जमीरला त्वरित घाटी रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपी (infamous goon) शोहेबला अटक केली.
कृपया हे देखील वाचा:
UP मधील गंगेतील मृतदेहांची महाराष्ट्रात चर्चा होते, पण बीडमधील मृतदेहांच्या विटंबनेची चर्चा होत नाही – देवेंद्र फडणवीस
राज्यात 5 टप्प्यात Unlock ! नियमावली जाहीर, तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात, जाणून घ्या
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नवं ट्वीट, शेअर केला ‘हा’ फोटो
डार्क मोडमध्ये कधीही वापरू करू नका स्मार्टफोन, होऊ शकते मोठे नुकसान
Comments are closed.