कोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या

maharashtra-unlock-10-districts-including-kolhapur-sangli-satara-will-be-included-in-the-third-phase
June 5, 2021

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने एकूण 5 टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून (दि. 7) कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार 5 टप्प्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत राज्यातील पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा (districts) समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांचा समावेश केला आहे. तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा (districts) समावेश आहे. तर चौथ्या टप्प्यात फक्त 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढल्यास पाचव्या स्तरात संबंधित जिल्ह्याचा समावेश केला जाईल.

 तिसऱ्या टप्प्यात सुरु होणारे जिल्हे पुढीलप्रमाणेः  अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, या जिल्ह्यांचा समावेश आहे

राज्य सरकारने जाहीर केलेली नियमावली खालीलप्रमाणे
1) अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार दुकाने बंद राहतील.

2) मॉल्स अन् चित्रपटगृहे पूर्णपणे बंद राहतील.

3) हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरु राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.

4) खासगी अन् सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती

5) सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरु राहणार आहेत. सुरू राहतील

6) इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील.

7) सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओमध्ये परवानगी

8) सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला सोमवार ते शुक्रवार प्रर्यंत 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी असेल.

9) विवाहसोहळ्याला 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठकीस 50 टक्के उपस्थित

10 कृषी क्षेत्रातील कामांन अन् ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी

11) दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहणार

कृपया हे देखील वाचा:
दोन सख्ख्या बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

नीती आयोगने म्हटले – ‘सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, तयार राहण्याची आवश्यकता’

पीएमपी संचालक राजीनामा नाट्याचा पुढील अंक ‘पोलिस ठाण्यात’ ! भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हल्ला’

तिसर्‍या लाटेपूर्वी खुशखबर ! देशात मुलांना याच महिन्यात मिळू शकते व्हॅक्सीन, जाणून घ्या कुठपर्यंत पोहचली तयारी