मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप सध्या अनेक नेते करत आहेत. ऐतिहासिक सिनेमांमध्ये विपर्यास केल्यावरुन आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awad) यांनी कार्यकर्त्यांसह ठाण्यातील विवियाना मॉल मध्ये (Viviana Mall) जाऊन ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाचा शो बंद पाडला. आता मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन राष्ट्रवादीकडून जातीय रंग दिला जात असल्याने काहीच न बोलण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांचे मत आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना (MNS Spokesmen) ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत.
अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब यांचे इतिहासाचे ज्ञान… आणि हे महाराजांचा इतिहास खरा काय आणि खोटा काय ते सांगत आहेत…
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) November 7, 2022
अफझलखानाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि…
ठाण्यात राष्ट्रवादीने हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्यानंतर त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकाला
मारहाण केल्याची घटना घडली. यानंतर आता मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना ठाण्यात रंगला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (MNS Ameya Khopkar) यांनी यावरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. अफझलखानाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब असं म्हणत त्यांनी आव्हाड यांना टोला लगावला आहे. अफझलखानाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब यांचे इतिहासाचे ज्ञान… आणि हे महाराजांचा इतिहास खरा काय आणि खोटा काय ते सांगत आहेत…, असं म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Har Har Mahadev | raj thackeray on har har mahadev director abhijit deshpande will take press conference today
हे देखील वाचा :
Pune Crime | सोमवार पेठेत ‘भाईगिरी’ करणारा गुंड अटकेत
You Must Die | ‘अ परफेक्ट मर्डर’ च्या खेळात प्रेक्षकांना गुंतवून टाकण्यासाठी सौरभ गोखले सज्ज