ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Former MP Sambhajiraje Chhatrapati) यांनी ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) आणि ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat) या मराठी चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awad) हे देखील आक्रमक झाले आहेत. या चित्रटांमध्ये शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील एका मॉलमधील ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटाचा शो बंद पाडला. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात (Vartaknagar Police Station) वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Case filed against NCP MLA Jitendra Awhad & 100 of his workers at Vartak Nagar PS, Thane for forcibly closing show of film 'Har Har Mahadev' in Thane mall yesterday & assaulting the audience. Case registered u/s 141,143,146,149,323,504 of IPC. No arrest made so far: Thane Police
— ANI (@ANI) November 8, 2022
‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटाला विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवार रात्री 11 वाजता ठाण्यात आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना सिनेमागृहाच्या बाहेर जाण्याचे आवाहन केले. यानंतरही सिनेमागृहात बसलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंग घडले. याच कारणामुळे वर्तकनगर पोलीस ठाण्यात आयपीसी 141,143,146,149,323,504 या कलमांतर्गत आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
शो बंद पडताय मग आमचे पैसे परत द्या अशी मागणी करणाऱ्या मराठी रसिकांना राष्ट्रवादी च्या गुंडांनी केलेली मारहाण !!@CMOMaharashtra @mieknathshinde @mnsadhikrut @RajThackeray pic.twitter.com/l1yvh5toIj
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) November 7, 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update