पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | वारजे माळवाडीत (Warje Malwadi Pune) स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय (Prostitution) सुरु असल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) उघडकीस आणले आहे. वारजे माळवाडी येथील अक्षय कॉलनीमध्ये सुरु असलेल्या ओम स्पावर (Om Spa) छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली असून स्पा मॅनेजरला अटक केली आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
स्पा मॅनेजर संदीप संतोष तिवारी Sandeep Santosh Tiwari (वय २३) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आकाश प्रकाश साळवे (Akash Prakash Salve) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र कुमावत (Police Constable Rajendra Kumawat) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४२९/२२) दिली आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथील ओम स्पामध्ये मसाजच्या नावाखाली
वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविला.
त्याने इशारा करताच सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ओम स्पावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने
छापा टाकला. तेथे दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात होता.
संदीप तिवारी या मॅनेजरला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Warje Malwadi ‘Raid’ by Crime Branch on Prostitution Business in the Name of Spa
हे देखील वाचा :
Pune Crime | सोमवार पेठेत ‘भाईगिरी’ करणारा गुंड अटकेत