बहुजननामा ऑनलाईन – You Must Die | अभिनेता सौरभ गोखले (Saurabh Gokhale) राधा ही बावरी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्या या अभिनयाने त्यांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. मालिके नंतर ‘कालविजयी सावकर’ या शॉर्ट फिल्मची त्याने घोषणा केली. तर आता सौरभ गोखले एका नव्या नाटकात (New Drama) रंगभूमीवर येणार आहे. ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकातून ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंगरे (Vijay Kinger) आणि सौरभ गोखले यांच्या जोडीने धमाल केली होती. तर आता पुन्हा एकदा ही जोडी ‘यु मस्ट डाय’ (You Must Die) हे नवीन सस्पेन्स थ्रिलर प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या नाटकातून भय चक्राचा गूढ प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे नाटक संपूर्ण रहस्यांनी भरल्याचे सौरभ गोखले यांनी सांगितले आहे.
प्रेक्षकांना या नाटकातून खेळवून ठेवणारी मनोरंजक कथा पाहायला मिळणार आहे.
एकामागे एक रहस्य उलगडत असताना मिळणारे गूढ या नाटकात पाहायला प्रेक्षकांना मजा येणार आहे. या नाटकात अभिनेता गौरव गोखले सह अभिनेत्री शर्वरी लोहकर (Sharvari Lohokare), संदेश जाधव (Sandesh Jadhav), नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), अजिंक्य भोसले (Ajinkya Bhosle), हर्षल म्हामुणकर (Harshal Mhamunkar), प्रमोद कदम (Pramod Kadam), विनिता दाते (Vinita Date), धनेश पोतदार (Dhanesh Potdar) हे कलाकार देखील दिसणार आहेत.
‘यु मस्ट डाय’ (You Must Die) या नाटकाचा शुभारंभ 12 नोव्हेंबरला होणार आहे.
याबाबतची अधिकृत माहिती सौरभ गोखले ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट टाकत हे नाटक कोण कोणत्या
ठिकाणी पाहायला मिळणार याची माहिती प्रेक्षकांना दिली आहे.
या नाटकाचे लेखन नीरज शिरवेकर (Neeraj Shirvekar) यांनी केले.
अशोक पत्की (Ashok Patki) यांनी नाटकाचे संगीत रचले. तर शीतल तळपदे (Sheetal Talpade)
यांनी प्रकाशयोजना केली आहे. मंगल केंद्रे (Mangal Kendre) यांनी वेशभूषा तर रंगभूषा राजेश परब
(Rajesh Parab) यांची आहे. सुशील स्वामी (Sushil Swamy) व धनेश पोद्दार (Dhanesh Poddar) यांचे
या नाटकाला दिग्दर्शन सहाय्यक मिळाले आहे. तर या नाटकाचे सूत्रधार संतोष शिदम (Santosh Shidam)
हे आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- You Must Die | radha hi bawari fame actor saurabh gokhale new drama you must die start from 18 november
हे देखील वाचा :
T20 World Cup 2022 | विराट कोहलीने पहिल्यांदाच पटकावला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार
Anushka Shetty | अनुष्का शेट्टीने दिले ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम ; म्हणाली ‘प्रभास हा माझा…’