पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | जुन्या भांडणावरुन कोयता हवेत फिरवून मी या ठिकाणचा भाई आहे, असे म्हणून दहशत निर्माण करुन तरुणाला बेदम मारहाण (Beating) करणार्या गुंडाला समर्थ पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सागर भुजंग नायडु Sagar Bhujang Naidu (वय २७, रा. सदानंदनगर, सोमवार पेठ) असे या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी शाहरुख ईस्माईल हंजगीकर Shah Rukh Ismail Hanjgikar (वय ३०, रा. सदानंदनगर, सोमवार पेठ) यांनी समर्थ पोलिसांकडे (Samarth Police Station ) फिर्याद (गु. रजि. नं. १९६/२२) दिली आहे. फिर्यादी व त्याचे मित्र रविवारी सायंकाळी आठ वाजता रिक्षामध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी सागर तेथे आला. जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्याने हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. मी या ठिकाणचा भाई आहे. कोणी आमच्यामध्ये आले तर एकेएकाला खल्लास करीन, असा आरडाओरडा केला. फिर्यादी यांना तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणून लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात मारुन जबर जखमी केले. फिर्यादी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी सागर नायडु याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक लोणारे (Assistant Police Inspector Lonare) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Gangster arrested for ‘Bhaigiri’ in Somwar Peth
हे देखील वाचा :
You Must Die | ‘अ परफेक्ट मर्डर’ च्या खेळात प्रेक्षकांना गुंतवून टाकण्यासाठी सौरभ गोखले सज्ज
T20 World Cup 2022 | विराट कोहलीने पहिल्यांदाच पटकावला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार
Anushka Shetty | अनुष्का शेट्टीने दिले ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम ; म्हणाली ‘प्रभास हा माझा…’