नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळी तोंडावर आली असतानाच सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate) सलग चौथ्या दिवशीही झळाळी पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्योरिटीजद्वारे दिलेल्या माहितीनुसार, आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी (दि. 9) सोन्याच्या दरात 277 रुपये प्रति 10 ग्रॅम (per10 gram) वाढ झाली आहे. चांदीचे दरही (Silver Rate) 650 रुपये प्रति किलोग्रॅमने वधारले आहेत. अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांच्या निवडीने आणि प्रोत्साहन आर्थिक पॅकेज घोषणेच्या शक्यतेमुळे, दोन्ही धातुंच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे.
आजचा सोन्याचा भाव (Gold Rate) : सोमवारी (दि.9) दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 277 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढल्यामुळे, सोन्याचा दर 52,183 रुपयांवर पोहचला आहे. याआधी शुक्रवारी, सोन्याचा दर 51 हजारांच्या घरात होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव आज 1960 रुपये प्रति औंस होता.
चांदीचा आजचा भाव (Silver Price) : सोन्याप्रमाणे चांदीचे भावही वधारले आहेत. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 650 रुपये प्रति किलोने वाढून 65,699 रुपये इतका झाला आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 65,005 रुपये इतका होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 25.75 डॉलर प्रति औंस होता.
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनलिस्ट्स कमोडिटीज तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपीय देशात कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात वाढ होत आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलरची कमजोरी, बायडन यांची राष्ट्रपतीपदी निवड आणि त्याअंतर्गत प्रोत्साहन आर्थिक पॅकेज घोषणेच्या शक्यतेदरम्यान सोन्याचे भाव वधारले असल्याचे, मोतिलाल ओसवाल फायनेंशियल सर्विसेजचे कमोडिटी रिसर्च वीपी. नवनीत दमानी यांनी सांगितले.