बहुजननामा ऑनलाइन टीम – अमेरिकेत होत असलेल्या निवडणुकीचे पडसाद संपूर्ण जगात उमटताना दिसत आहेत. अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीत चांगलीचं लढाई पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात. राष्ट्रपती कोणीही झाले तरी सोन्याचे दर(Gold prices) वाढणार हे निश्चित आहे. सध्या सोन्याचे आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. परिणामी, सोन्यात गुंतवणूक(Gold prices) करावी की नको अशा मनःस्थिती ग्राहक अडकले आहेत. परिणामी ऐन सणांच्या दिवसांमध्ये ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. तर दिवाळीनंतर सोन्याचे दर ६० हजार रुपयांच्या घरात पोहोचतील असं देखील सांगण्यात येत आहे.
शेअर बाजार, सोने आणि मुद्रा बाजारला याचा मोठा फटका बसणार आहे.
goodreturns.in या वेबसाइटनुसार गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९९०० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५०९१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९६६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५४१६० रुपये आहे.