FIR against Devendra Kothe | भाजपा नेत्याचे मुस्लिम समाजाबद्दलचे आक्षेपार्ह वक्तव्य एकनाथ शिंदे गटाला खटकले, गुन्हा दाखल

सोलापूर : FIR against Devendra Kothe | सोलापूर लोकसभा मतदारसंघातील (Solapur Lok Sabha) भाजपाचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) राम सातपुते (Ram Satpute) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची सभा झाली होती. या सभेत भाजपा नेते देवेंद्र कोठे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde) अल्पसंख्यांक विभाग जिल्हाप्रमुखाने केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्यात (Jail Road Police Station Solapur) कलम २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

ऐन निवडणुकीत देवेंद्र कोठे हे सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना सोडून भाजपामध्ये आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता. देवेंद्र कोठे हे सुशीलकुमार शिंदे यांच्या कॅम्पेनसाठी काम करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी खेळी करत प्रणिती शिदेंना ऐन लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का दिला होता.