पुणे : बहुजननामा ऑनलाईन – छत्तीसगडमध्ये झालेल्या तबरेज अंसारी याचा जमावाने मारहाण करून खून केल्याविरोधात पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी येथे जमले होते.
यावेळी मुस्लीम समाजाचाही समावेश अट्रॉसिटी कायद्यांतर्गत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. तर तबरेज अंसारी हा मॉब लिंचिंगचा एकटा बळी नसून पुण्यातील मोहसीन शेख हा पहिला बळी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मुस्लीमांवर वाढते अत्याचार पाहता सरकारने मुस्लीम समाजाला अट्रॉसिटी कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात यावे यासह मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
पुणे जिल्हा मुलनिवासी मुस्लीम मंच व फुले शाहू आंबेडकरी समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांच्या वतीने यावेळी जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. देशात मुलामींमध्ये एका धार्मिक नाऱ्यासाठी मुस्लीम समाजावर बीफ खाल्ल्याचा व चोरीचा मुद्दा घेऊन ठराविक कारणासाठी जीव जाईपर्यंत मारहाण करत धार्मिक नारा वदवून घेतला जातो. अशांना धर्मचे रक्षणकर्ते म्हणायचे का? देशात मॉब लिचिंगच्या घटना या मुस्लीमविरोधी आहेत. त्यावर कठोर पाऊल उचलून कारवाई करावी.
तसेच मुस्लीम समाजाला अट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे. अशी मागणी कऱण्यात आली. तर मॉब लिंचिंगचे यापुर्वी बळी झालेले आहेत. त्यात २०१३ साली पुण्यातील मोहसीन शेख याची हत्या हा त्याचा पहिला बळी ठरला आहे. त्यानंतर भारतात पहलू खान, तबरेज अन्सारी असे अनेक जण याचे बळी ठरले आहेत.