बहुजननामा ऑनलाइन टीम –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा ई-मेल मिळाला आहे. त्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
ई-मेलमध्ये केवळ तीन शब्दच लिहिले आहेत. ’किल नरेंद्र मोदी’ असा उल्लेख आहे. याबाबत एनआयएने केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून सतर्क केले आहे. गृहमंत्रालयाने याबाबत एसपीजीलाही माहिती दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने पत्रात एनआयएला एक ई-मेल आयडी सापडला आहे. ज्यात काही मान्यवरांच्या हत्येचा उल्लेख करण्यात आला. ई-मेलमधील मजकुरातून असेच संकेत मिळत आहेत. एनआयएने आपल्या पत्रासोबत ई-मेलची कॉपीही जोडली आहे. गृहमंत्रालयाने यावर योग्य कारवाई करण्यास सांगितले आहे. हा ई-मेल काल मध्यरात्री 1 वाजून 34 मिनिटांनी पाठवला आहे. मेलमध्ये नरेंद्र मोदी यांना मारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. हा ई-मेल समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रॉ, गुप्तचर यंत्रणा, संरक्षण गुप्तचर यंत्रणा एनआयएच्या संपर्कात आहे. सध्या या ई-मेलमधील मजकुराचा तपास सुरु आहे.