बहुजननामा ऑनलाइन टीम –अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कारवाईला सुरुवात केली आहे. एनसीबीने सुशांतचा मॅनेजर सॅम्यूअल मिरांडाला ताब्यात घेतले आहे. जवळपास अडीच तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने त्याला ताब्यात घेतले आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एनसीबीकडून सकाळी सॅम्यूअल मिरांडा आणि रिया चक्रवर्तीच्या घरावर धाड टाकण्यात आली. एनसीबीची टीम सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रियाच्या घरी दाखल झाली होती. एनसीबीने आतापर्यंत चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. बॉलिवूडसह मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा विकणार्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार यांना अटक करण्यात आली आहे.