बहुजननामा ऑनलाइन टीम –भारतात पुन्हा टिकटॉक (TikTok)ची वापसी होण्याची शक्यता आहे. टिकटॉकच्या भारतीय एसेटला जपानी कंपनी सॉफ्टबँक खरेदी करण्याचा विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ती कंपनी भारतीय भागीदार देखील शोधत आहे आणि कंपनीचं रिलायंस जीओ तसेच इयरटेल सोबत बोलणी सुरू आहे.
जुलै मध्ये लावण्यात आला होता बॅन
भारत सरकारने जुलै मध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे आणि गोपनीयतेचे कारण सांगत TikTok सह एकूण 58 चिनी अँप्सवर बंदी घातली होती. टिकटॉक वर अमेरिकेत सुद्धा बंदी घालण्यात आली असून तिथं टिकटॉक खरेदी करण्याचा प्रयत्न अनेक टेक कंपन्या करत आहेत.
या कंपनीत सुरु आहे बातचीत
TikTok ची चिनी पेरेंट कंपनी बाइटडान्स मध्ये जपानी समूह सॉफ्टबँकची भागीदारी आधीपासूनच आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार सॉफ्टबँक TikTokचा भारतीय कारभार खरेदी करण्याचा प्रयत्न करत असून याबाबत रिलायंस जीओ तसेच एयरटेल सोबत कंपनीची बोलणी सुरू आहे. सॉफ्टबँक अन्य पर्याय देखील शोधत आहे.
जपानी कंपनी सॉफ्टबँकने भारतात ओला कॅब, स्नॅपडील, ओयो रूम्स सारख्या अनेक स्टार्टअप मध्ये आपली गुंतवणूक केली आहे. याआधी ऑगस्ट मध्ये चर्चा सुरू होती की टिकटॉकचा भारतातील कारभार रिलायंस खरेदी करू शकतो.
TikTok भारतात लोकप्रिय
हा अँप बॅन करताना TikTokचे 30% युजर्स भारतीय होते आणि याची 10% कमाई भारतातून होत होती. एप्रिल 2020 पर्यंत गुगल प्ले स्टोअर वरून आणि अँपल अँप स्टोअर वरून टिकटॉकचे 2 अरब डाउनलोड केले गेले होते. यापैकी जवळजवळ 30% म्हणजे 61.1 कोटी डाउनलोड भारतातून केले होते.
मोबाईल इंटेलिजन्स फर्म सेन्सर टॉवर नुसार टिकटॉकचे डाउनलोड चिनपेक्षाही भारतात अधिक होते. चीनमध्ये टिकटॉकचे डाउनलोड फक्त 19.66 कोटी असून याचा वाटा फक्त 9.7% आहे.