बहुजननामा ऑनलाइन टीम –दिवगंत माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या कुटुंबातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुलगा रोहित पाटील आणि आबांचे भाऊ सुरेश पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सार्वजनिक कार्यक्रमात रोहित पाटील, पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आमदार सुमनताई पाटील यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. तर रोहित आणि सुरेश पाटील यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरातच आयसोलेशन करण्यास सांगत उपचार सुरू केले आहे. आर आर पाटील यांच्या आईचा रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहे. रोहित तासगाव मधील कोरोना हॉस्पिटल उद्घाटनासाठी हजर होते, तर या कार्यक्रमासाठी पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह शासकीय अधिकारी व नेतेही या कार्यक्रमास हजर होते.