अहमदाबाद : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौर्यावर येणार असून २४ फेब्रुवारीला ते गुजरातला भेट देणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्याची चर्चा असून त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी गुजरात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. ट्रम्पच्या स्वागतासाठी राज्य सरकार १०० कोटींपेक्षा जास्त खर्च करणार असल्याचे एका अहवालानुसार समोर आले आहे.
२४ फेब्रुवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद येथे तीन तासांच्या दौऱ्यावर जाणार असून त्यांच्या स्वागतासाठी राज्य सरकार १०० कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे. ट्रम्प यांच्या दौर्याची तयारी जोरात सुरू आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान अर्थसंकल्प आडवा येऊ नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
अहमदाबाद महानगरपालिका आणि अहमदाबाद नगरविकास प्राधिकरण शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व त्यांचे सुशोभीकरण सातत्याने करत आहेत. यासाठी एकूण १०० कोटींपेक्षा जास्त खर्च येणार असून १७ रस्ते दुरुस्ती व १.५ रस्त्यांच्या दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी ६० कोटी बजेटचे वाटप करण्यात आल्याचे एका अहवालानुसार समजते आहे. हा १.५ किमी रस्त्यावरून ट्रम्प विमानतळावरून थेट मोतेरा स्टेडियमकडे जाणार आहेत. या रस्त्याच्या सुशोभिकरणासाठी ६ कोटींचे बजेट खासकरुन वाटले असून विकास प्राधिकरण रस्त्यांसाठी २० कोटी बजेट खर्च येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी केंद्र सरकारही खर्च करत असून त्यातील मोठा खर्च राज्य सरकार करत आहे. सर्व विभागांना निर्देश दिले आहेत की, लॉजिस्टिक आणि प्रशासनाची कामे वेळेपूर्वी करावी. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाही.