सूरत : वृत्तसंस्था – सोशल मीडिया टिकटॉकवर दिवसेंदिवस अनेक विडिओ व्हायरल होत असतात. एकीकडे व्हिडिओतून लोकं समोर येत आहेत, तर दुसरीकडे टिकटॉक बनवणारे लोकं अडचणीत सापडत आहेत. सुरतच्या टिकटॉक स्टार कीर्ती पटेल हिच्यासोबत असेच काही घडले आहे. कीर्तीने घुबडाला घेऊन व्हिडीओ बनवला असून वन विभागाने तिच्यावर २५ हजार रु.चा दंड लावला आहे. कीर्तीचा हा विडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी तिच्यावर टीका केली. वन विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
वाइल्डलाइफ अँड नेचर वेल्फेयर ट्रस्टने वन विभागाच्या मुख्य वन संरक्षकाने याप्रकरणी तक्रार केली आहे. या ट्रस्टने कीर्तीने व्हिडिओ बनवताना ज्या प्रकारे घुबडाला पकडले आहे, हे वाइल्डलाइफ प्रोटेक्शन ऍक्ट १९७२ कलमाचे उल्लंघन आहे, असा आरोप केला आहे. त्याप्रकरणी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच पूर्ण चौकशीचे आदेश दिले आहेत.
https://twitter.com/schintan19882/status/1221051852868870144
कीर्ती यांनी वनविभागाने लादलेला दंड भरला असून कीर्तीने दंड भरल्याच्या पावतीसोबतही एक व्हिडिओ शेअर केला आहे. कीर्तीला घुबड देणाऱ्या कर्मचार्यासही वनविभागाने १० हजार रुपये दंड ठोठावला असून वनविभागाने नागरिकांना जनावरांना अशाप्रकारे त्रास देऊ नये, असे आवाहन केले आहे. घुबड हा संरक्षित जीव असून त्याला पकडणे वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा मानले जाते. घुबडांबरोबर कोणत्याही प्रकारची छेडछाड करणे किंवा त्याला पकडणे गुन्हा मानले जाते.