नवी दिल्ली : वृत्तसंस्था- देशभरात एवढ्या मोठया प्रमाणात बेरोजगारी वाढली असताना केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये विविध ६. ८४ लाख जागा रिक्त असल्याची माहिती नव्यानेच समोर आली आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान ही माहिती मिळाली आहे.
याबाबत संसदेत विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तर दिले. त्यावेळी ते म्हणाले कि, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये एकूण मंजूर जागा ३८.०२ लाख होत्या. त्यातील मार्च अखेर ३१. १८ जागा भरल्या गेल्या असून आता रिक्त पदांची संख्या ६. ८४ आहे.
संबंधित मंत्रालये ,डिपार्टमेंट,आणि संस्थांच्या नियमानुसार रिक्त भरवायच्या आहेत. परंतु त्याला विलंब लागत आहे. विविध मंत्रालये होणाऱ्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया वर्षभर सुरु असते. यावर्षी विविध मंत्रालयातील १ लाख ३ हजार २६६ भरणार असून पुढील वर्षीपासून स्टाप सिलेक्शन कमिशनकडून परीक्षा घेण्याचे नियोजन केले असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हंटले आहे.