नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यावर लगेच दिल्लीतील जनतेचा ओपिनियन पोल प्रसिद्ध होऊ लागले आहेत. ओपिनियन पोलमधून दिल्लीमध्ये आपाचीच सत्ता पुन्हा येणार असल्याचे सी-व्होटरने दाखवले आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पुन्हा एकदा निवडून येणार असून भाजप आणि काँग्रेस हे दोन आकडी जागाही जिंकू शकणार नाहीत, असा अंदाज ओपिनियन पोलद्वारे सिद्ध होत आहे.
सी-व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार भाजपला ५९ जागा मिळतील. तर केजरीवाल यांच्या समोर आव्हान उभे करणाच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला फक्त ८ जागा मिळतील, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नसून यावेळी निदान ३ तरी मिळतील, असा अंदाज आहे.
मतदानाच्या टक्केवारीनुसार आम आदमी पक्षाला ५३%, भाजपला २६%, काँग्रेसला ५% आणि इतर पक्षांना १६% मतं मिळतील, असा अंदाज पोलनुसार लावला जात आहे. २०१५ मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने ६७ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला केवळ तीनच जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.