नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली – लखनऊ हायवे मार्गावर माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून रस्ता ओलांडताना एकाच मृत्यू झाला. त्यांनतर त्याचा मृतदेह सुमारे १२ तास हायवेवर तसाच पडून असताना त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. याच मार्गावरून पोलिसांच्या गाड्या १० ते १५ वेळा गेली. पण त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही.
सायंकाळी हायवे क्रॉस करताना एका वेगाने येणाऱ्या गाडीने धडक दिल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती मिळत आहे. त्याच्या १२ तासानंतरही तो मृतदेह तिथेच पडून राहिला. तरुणाच्या मृतदेहाचा चक्काचूर झाल्यावर १३ तासांनी पोलिसांना याबद्दल माहिती मिळाली.
मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट झाली असून त्याची ओळख पटवणे अवघड झाले होते. तरीही पोलिसांनी मृतदेहाच्या कपड्यावरून मृताचे लिंग ओळखण्याचा प्रयत्न केला असून नंतर तो मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला गेला. गुजरात पोलीस स्थानकाचे मुख्य अधिकारी जयवीर सिंग यांनी, डीएनए रिपोर्ट काढला असून अजूनही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. असाच प्रकार पुणे – मुंबई एक्सप्रेस वेवर घडला होता. येथे मृत्यू झालेल्या मृतदेहावरून जवळजवळ ६० गाड्या गेल्या होत्या.