नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये एका छोट्या गावात राहणाऱ्या महिलेने डॉक्टर होण्यासाठी नीटची प्रवेश परीक्षा दिली असून ऑल इंडिया रँकमध्ये तिला २२८३ क्रमांक मिळवला आहे. या महिलेने ओबीसी रँकनुसार ६५८ वा क्रमांक मिळवला आहे. या महिलेचे खूप कौतुक होत असून तिचे लग्न वयाच्या ८व्या वर्षी झाले असताना तिचे नाव रुपा यादव आहे.
रुपा ही पहिल्यापासून अभ्यासात हुशार असून लहानपणी बालविवाहामुळे तिला आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यांचे लग्न झाले तेव्हा ती तिसरीच्या वर्गात होती. पण तरीही ती आज एक डॉक्टर होऊ शकली. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती नाजूक असल्याचे रूपाने सांगितले. रूप शिक्षणासाठी कधीच डगमगल्या नाहीत. शाळेपासून घर हे अंतर जास्त असतानाही त्यांनी गावापासून ३ किलोमीटर दूर स्टेशनपर्यंतचा प्रवास करत तिथून ती बसमधून शाळेत जात असत. दरम्यान घरातील कामाचेही तिच्या समोर आव्हान होते.
डॉक्टरच का ?
रुपाने सांगितले की, काका भीमाराम यादव यांची हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याचे कारण त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळाला नाही. त्यानंतर तिने बॉयोलॉजीचे शिक्षण घेत डॉक्टर बनण्याचा संकल्प करत दिवस-रात्र मेहनत केली आणि नीट परिक्षा उत्तीर्ण केली.
यापूर्वी देखील पास झाली होती ‘नीट’ परिक्षा –
रुपाने यापूर्वीही २०१६ मध्ये पहिल्यांदा ‘नीट’ परिक्षा पहिल्यांदा केली होती. पण रॅंकनुसार तिला महाराष्ट्र राज्य मिळाल्यामुळे तेथे घरचे पाठवायला तयार नव्हते. यानंतर २०१७ मध्ये तिने पुन्हा ‘नीट’ पास झाली केली. पण त्यानंतर आता पुन्हा तिने ऑल इंडिया रॅकिंगमध्ये २२८३ वा रॅंक मिळवला आहे.
कुटूंबाने दिली साथ –
लग्नानंतर तिची बहीण रुक्मा देवी आणि बहिणीचे पती बाबुलाल यांना तिची अभ्यासातील ओढ दिसून आली. त्यामुळे त्यांनी तिला साथ दिली आणि तिनेही सामाजिक अडचणी दूर करत अभ्यासाला सुरुवात केली. शिक्षणाचा खर्च उचलत दोघांनी शेती केली आणि टॅप्मो, रिक्षा चालवली. रुपाने जेव्हा डॉक्टर बनण्याची इच्छा पती आणि बहिणीचे पती बाबुलाल यांच्यासमोर व्यक्त केली, तेव्हा त्यांनी तिला कोचिंगसाठी कोटाला पाठवले.
पत्नीला पाहून पतीने देखील केली शिक्षणास सुरुवात –
रुपा शिक्षण घेत असल्याचे पाहून पती शंकर लाल यादव यानेही शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर दोघांनीही शिक्षणाला सुरुवात केली असून सध्या शंकर ‘एमए’च्या प्रथम वर्षात शिकत आहेत.