पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दलित तरुणाला मित्रांनी कपडे आणि भांडी धुण्यास सांगितले. मात्र त्याने त्याला विरोध केला असता त्याला एका खोलीत डांबून मारहाण केली. मारहाणीनंतर उपचार घेत असताना या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रामस्वरुप असे आहे.
रामस्वरुप हा खराडीतील फर्निचरच्या दुकानात कामाला होता. मारहाणीत जखमी झाल्यानंतर या तरुणाला राजस्थान येथे पाठवण्यात आले होते. तेव्हा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर चंदननगर पोलिसांनी तिघांवर राजस्थानामध्ये झीरोने गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो आता पुण्यात चंदननगर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.
परशुराम, जगदीश, हजारीराम (रा. सारसण्डा तहसील डेगाना जिल्हा नागौर) या तिघांविरोधात खून, आणि अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामस्वरूप याला पुण्यात दोन महिन्यांपुर्वी पुण्यातील खराडी येथे असलेल्या चौधरी वस्ती येथे फर्निचरच्या दुकानात काम करण्यासाठी राजस्थानहून आला होता. त्यावेळी पप्पूराम आणि त्याचा मित्र जगदीश यांनी त्याला कपडे धुणे, भांडी साफ करणे, व घरातील साफ सफाई करणे, स्वयंपाक करणे अशी कामे करण्यास सांगितली. त्यानंतर त्याने काही दिवस ही कामे केली. मात्र काही दिवसांनी रामस्वरुप याने ही कामे करण्यास नकार दिला.
नकार देताच दुकानातील खोलीत डांबून मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेलल्या रामस्वरुपला ६ मे रोजी त्याच अवस्थेत राजस्थान येथे त्याच्या मुळ गावी नेण्यात आले. तेव्हा जोधपूर येथे त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा ४ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वडिलानी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गुन्हा पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार करत आहेत.