मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ‘किडनी घ्या पण, बियाणे द्या’ अशी करुण मागणी करणाऱ्या हिंगोलीच्या नामदेव पतंगे या शेतक-याचा मुद्दा सभागृहात मांडला. मात्र धनंजय मुंडे यांची ही मागणी फेटाळण्यात आली.
हिंगोली जिल्हातील शेणगाव तालुक्यातील शेतकरी नामदेव पतंगे यांनी सततच्या दुष्काळाला कंटाळून ‘किडनी घ्या पण, बियाणे द्या’ अशी करुण मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे केली होती. त्यावर सभागृहात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, अशी मागणी करणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि सभागृहात यावर चर्चा व्हायला हवी. मात्र त्यांची ही मागणी फेटाळ्यात आली.
मागणी फेटाळण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या अवस्थेची सरकारला काहीच पडलेली नाही असे टीका आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मुंडेंनी केली आहे. आपल्या ट्विटरवर नामदेव पतंगे यांच्या व्हिडीओ शेअर केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये मुंडे म्हणाले आहे की, ‘किडनी घ्या पण, बियाणे द्या’ हिंगोलीच्या नामदेव पतंगे या अल्पभूधारक शेतकऱ्याने शासनाकडे ही करूण मागाणी केली. आज दुष्काळाची ही दाहकता आहे. सभागृहात २८९ अन्वेय दुष्काळाचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला. त्यावरील चर्चा नाकारण्यात आली. शेतकऱ्यांच्या अवस्थेची सरकारला काहीच पडलेली नाही.