वाराणसी : वृतसंस्था – हिंदु धर्मतील पवित्र स्थळ म्हणून वाराणसी परिचीत आहे. वारासणी महापालिकेच्या बैठकीत नुकताच एक ठराव पास करण्यात आला.या ठरावनुसार वाराणसीतील सर्व मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळांच्या २५० मीटर परिघात दारू, मांसाहाराची विक्री आणि सेवनावर प्रशासनाने पूर्ण बंदी घातली आहे.
काशी विश्वनाथ मंदिर, मथुरेतील कृष्ण जन्मभूमी आणि अलाहाबाद येथील संगम क्षेत्रात एक किलोमीटर अंतरापर्यंत दारूच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश दिले. अबकारी खात्याच्या अधिका-यांनी हे निर्देश दिले आहेत.
वाराणसीतील मंदिर परिसरातील मांस विक्री व दारु विक्रीवर बंदी घालून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला शब्द पाळला आहे. त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये वाराणसी, वृंदावन, अयोध्या, चित्रकूट, देवबंद, देवा शरीफ, मिश्रीख-नैमिशारण्य येथील सर्व पूजास्थळांवर दारूची दुकाने आणि मांसाहारी भोजनावर प्रतिबंध लादण्याची घोषणा केली होती.