उना : वृत्तसंस्था – गुजरात राज्यातील उना शहरात एका २९ वर्षीय दलित तरुणाला दोन गावगुंडांकडून रस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करणाऱ्या दोघांना दोन वर्षांपूर्वी पिडीत तरुणाच्या भावाचा खून केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी उना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
पियुष सरवईया म्हणाला की, गुरुवारी तो उना शहरातून आपल्या गावी ओंकोली येथे जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी समोरून दोघे आरोपी भीखाबाई आणि अर्जून बाबूभाई मकवाना हे दोघे उलट दिशेने समोरून येत होते. त्यांनी समोरून येऊन त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर मकवाना खाली उतरला आणि त्याने बाचाबाची करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोघांनी लाथा देखील मारल्या. मात्र तो त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका कऱण्यात यशस्वी झाला. त्यानंतर त्यांनी त्याचा पाठलाग केला. तेव्हा त्याचा मित्र तेथे आला. त्यानंतर तेथे जमाव जमू लागल्याने दोघेही पळून गेले.
त्यांनी पाठलाग करत त्याला धमकावण्यास सुरुवात केली. आता आम्हाला न्यायालयाने अंतिम श्वासापर्यंतची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता कोणत्याही शिक्षेची आम्हाला भीती नाही.
केला होता भावाचा खून
अर्शी भीखाभाई आणि मकवाना या दोघांनी पियुषच्या मोठया भावाचा नोव्हेंबर २०१८ मध्ये खून केला होता. त्यानंतर त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
अर्शी याचे वडिल भीखाभाई देखील याच गुन्ह्यात कारागृहात आहेत. २०१२ साली अर्जन मकवाना आणि ११ जणांनी भीखाभाई वाजा याची मुलगी बेपत्ता झाल्याचे आरोप लावत पियुषचा भाऊ लालजी याच्या घराला आग लावली होती. भीखाभाई वाजा आणि त्याचा भाऊ धीरू व मुलगा राम भाई हे लालजी याच्या खून प्रकरणी दोषी ठरले होते.