नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – खर्डे ता देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी पुरुष आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी तसेच कर्मचाऱ्यांची मनमानी थांबवण्यात यावी अशी मागणी करत भारिप बहुजन महासंघाच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आले आहे .यासंदर्भात त्यांनी गटविकास अधिकारी मनोज जाधव यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात अतिदुर्गम अशा खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक दिवसांपासून निवासी वैद्यकीय अधिकरी नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. संबंधित आरोग्य केंद्रात सहा उपकेंद्रे आणि १६ गावांचा समावेशआहे. तालुक्यातील सर्वात मोठे कार्यश्रेत्र असलेल्या या दवाखान्यात दोन निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा असताना गेल्या अनेक दिवसांपासून एकाच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे.
तसेच आहे तेही मुख्यालयी राहत नसल्या कारणाने रात्री अपरात्री येणाऱ्या रुग्णावर उपचारासाठी खाजगी दवाखान्यात जाण्याची वेळ येत असल्याने त्यामुळे ग्रामिण भागातील गोरगरीब जनतेला हलाखीची परिस्थिती असताना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे येथील सरकारी यंत्रणेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन या ठिकणी कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रति जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक ,गटविकास अधिकारी ,तालुका वैद्यकीय अधिकारी ,तहसीलदार ,यांना देण्यात आल्या आहेत. भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष दिगंबर जाधव ,बार्शीचे सरपंच बळीराम वाघ ,यादव पवार ,सुभाष माळी ,प्रफुल्ल वाघ ,सुरेश जाधव ,आदी भारिप कार्यकर्त्यांसह सह्या आहेत.