बारामती बहुजननामा ऑनलाईन – पती पत्नीमध्ये वाद घरगुती कारणामुळे होतात. ते कधी कधी विकोपालाही जातात. परंतु कोरोनाची चाचणी करून घे असं पती म्हणाला म्हणून संतापलेल्या पत्नीने पती आणि सासूला लोखंडी विळीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये उघडकिस आला आहे.
सध्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतभर ल़ॉकडाऊन करण्यात आले आहे. लोक घऱातच राहून काळजी घेत आहेत. परंतु पिंपरीतून आपली पत्नी परतल्यानंतर तिला तू कोरोनाची चाचणी करून घे असं पती म्हणाला. त्यामुळे संताप अनावर झाल्याने पत्नीने चिडून पतीच्या अंगावर धावून जात त्याला मारहाणण करण्यास सुरुवात केली. मुलाला सुन मारत असल्याचे पाहून आईने मध्यस्थी केली.
त्यावेळी सुनेने घरामध्ये असलेला लोखंडी विळा उचलला आणि कशाचाही विचार न करता आपल्या सासू आणि पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात पती आणि सासू जखमी झाली आहे. पतीने याबाबत बारामती शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.त्यानुसार पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.