मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या जगात कोरोनाने दहशत माजवली असताना त्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी डॉक्टर्स जीवतोड मेहनत करताना दिसत आहेत. असच एक उदाहरण आज समोर आलंय. पुण्यातील महिला विषाणूतज्ञ डॉक्टर मीनल दाखवे-भोसले यांनी स्वतच्या बाळाला जन्माला घालण्यास अवघी काही मिनिटं उरलेली असताना आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट कीट जन्माला घातलं आणि मगच बाळाला जन्माला घातलं. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट शोधण्यात आलं आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून त्यांचं कौतुक केलं आहे.
त्यांनी आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला.पुण्याच्या डॉ. मीनल दाखवे भोसले यांचे अनंत आभार. अशा कर्तव्यनिष्ठ माणसांसमोर मान आदराने झुकते.https://t.co/D8C4JwiC6V
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 28, 2020
मीनल दाखवे भोसले या मायलॅब फार्मा कंपनीत संशोधन व विकास विभागाच्या प्रमुख म्हणून काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट शोधण्यात आलं आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या कामगिरीला सलाम करत ट्विट केलं आहे. त्यांनी आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर स्वतच्या बाळाला जन्म दिला. पुण्याच्या डॉ. मीनल दाखवे भोसले यांचे आभार. अशा कर्तव्यनिष्ठ माणसांसमोर मान आदराने झुकते असे त्यांनी ट्विट केले आहे.
पुण्यातील मायलॅब डिकवरी सोल्यूशन्स प्रा. लि. ही कंपनी मॉलिक्यूलर डायग्नोस्टिक्स या क्षेत्रात काम करते.कंपनी वेगवेगळ्या आजारांचं निदान करण्यासाठी अनेक टेस्ट किट्स बनवते. भारतात कोरोना प्रादुर्भाव ओळखण्यासाठी टेस्ट किटस विदेशातून मागवून घ्यावे लागतात. हे किट महागडे आहेत. त्यामुळे हे किट तयार करण्यात आले आहे. हे किट विदेशी किट्च्या मानाने स्वस्त आहे. अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.WHO च्या मानांकनानुसार ही किट बनविली असून त्याला एफडीए आणि सेंट्र्ल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑरगनायजेशन व आयसीएमआर यांची मान्यता प्राप्त आहे. अतिशय विक्रमी कालावधीत हे कीट तयार करण्यात आले आहे. आम्ही एका आठवड्यात दीड लाख किट तयार करु शकतो असे कंपनीने दिली.