मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – भारतातही कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी २१ दिवसांकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन ची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. दारूची दुकाने देखील बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अशातच सरकारने काही वेळासाठी दारूची दुकाने उघडी ठेवावीत अशी मागणी अभनेता ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर ट्विट करून केली आहे.
ऋषी कपूर यांचे पहिले ट्विट
‘सरकारने सायंकाळी काही वेळासाठी सरकारी परवाना असलेली दारुची दुकानं उघडी ठेवायला हवीत. मला चुकीचं समजू नका. लोक आपआपल्या घरी प्रचंड नैराष्य घेऊन थांबले आहेत. त्यांच्या अवतीभवती प्रचंड अश्चितता आहे,’ अशी मागणी अभिनेते ऋषी कपूर यांनी केली आहे.
Think. Government should for sometime in the evening open all licensed liquor stores. Don’t get me wrong. Man will be at home only what with all this depression, uncertainty around. Cops,doctors,civilians etc… need some release. Black mein to sell ho hi raha hai. ( cont. 2)
— Rishi Kapoor (@chintskap) March 28, 2020
ऋषी कपूर यांचे दुसरे ट्विट
दरम्यान लॉकडाऊनच्या काळात दारूची विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. ऋषी कपूर यांनी आपल्या दुसऱ्या एका ट्विट मध्ये म्हंटले आहे की, ‘तशीही काळ्याबाजारात दारुची विक्री सुरुच आहे. राज्य सरकारला यावेळी एक्साईज ड्युटीद्वारे पैशांची नितांत गरज आहे. फ्रस्ट्रेशन बरोबर डिप्रेशन होऊ नये , तसेही लोक पीत आहेतच, तर मग त्याला कायदेशीर करुन टाका. हे माझे विचार आहेत”.
State governments desperately need the money from the excise. Frustration should not add up with depression. As it is pee to rahe hain legalize kar do no hypocrisy. My thoughts.
— Rishi Kapoor (@chintskap) March 28, 2020
आणीबाणी जाहीर करण्याची मागणी
ऋषी कपूर यांनी यापूर्वी सोशल मीडियावर देशात आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्याची मागणी केली होती. ऋषी कपूर यांनी ट्विटरवर लिहिले होते – माझ्या प्रिय देशवासियांनो, देशात काय घडत आहे. काही झाले तरी आपत्कालीन परिस्थिती जाहीर करावी.
Dear fellow Indians. We must and have to declare EMERGENCY. Look at what’s happening all over the country! If the TV is to believed,people are beating policemen and medical staff! There is no other way to contain the situation. It is only good for all of us. Panic is setting in.
— Rishi Kapoor (@chintskap) March 26, 2020
ऋषी कपूर पुढे लिहितात – जर तुम्हाला टीव्हीवर विश्वास असेल तर लोक पोलिस आणि वैद्यकीय व्यावसायिकांना मारहाण करतात. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. हे आपल्या सर्वांसाठी चांगले आहे.