मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसची लागण हजारो लोकांना झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तसेच मृतांचा आकडा देखील वाढत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून उपाय योजना केल्या जात आहेत. देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. नागरिकांना घरामध्ये राहण्याचे आणि योग्य अंतर ठेवण्यास सांगितले जात आहे. मात्र तरी देखील काही नागरीक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे मात्र याचा काहीच परिणाम होताना दिसून येत नाही. काही ठिकाणी पोलिसांवरच आरेरावी करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/abhikhopade/status/1243917635445817344
देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी 14 एप्रिलपर्यंत घरातून बाहेर पडू नये असे वारंवार सांगण्यात येत आहे. असे असताना देखील नागरिकांकडून शासनाच्या आणि पोलिसांच्या सूचनांचा अनादर केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरूण लॉकडाऊन दरम्यान गाडीवरून फिरायला जाण्याचा बेतात असतानाच त्यांना पोलिसांनी पकडलं. सुरुवातील पोलिसांनी त्यांना प्रेमाने आणि साध्या भाषेत समजावून सांगितले. मात्र हे तरुण पोलिसांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
सोशल मीडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुणांनी पोलिसांना कशी उडवाउडवीची उत्तरे आणि दादागिरीची भाषा वापरली हे पहायला मिळत आहे. त्यानंतर पोलिसांनी दांडुक्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता दोन तरुणांनी दांडका पकडून आरेरावीची भाषा केली. विनाकारण दादागिरी करून पोलिसांसोबत हुज्जत घातली. पोलिसांनी एकाची मानगुटी तर दुसऱ्याची कंबर धरून खेचत पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनग्रस्तांची संख्या आहे. महाराष्ट्रात आज कोरोनाग्रस्तांची संख्या 193 वर पोहचली आहे. पुण्यामध्ये 1, मुंबईत 4, सांगली 1 तर नागपूरमध्ये 1 असे 7 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी महाराष्ट्रात 28 नेवे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 183 वर पोहचली होती. तर मुंबईत 108 रुग्णांची शनिवारी नोंद झाला होती. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या आकड्यामुळे भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.