बीजिंग : वृत्तसंस्था- कोरोनाचा संसर्ग जगभर सगळीकडे पसरला असून जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने याला जागतिक महामारी घोषित केल आहे. चीन मधल्या वुहान प्रांतांमधून पूर्ण जगात पसरलेल्या कोरोनाच्या विषाणूमुळे आतापर्यंत १६८,०१९ जणांना याचा संसर्ग झाला असुन, ६६१० जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या संसर्गाशी अनेक देश दोन हात करत आहे. परंतु कोणत्याही देशाला या रोगावर निश्चित अशी लस विकसित करण्यात आली नाही.
चीनमध्ये वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत काही माकडांना कोरोनाचा संसर्ग केला होता. या माकडांच्या शरीरात या रोगाशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती असल्याचं उघड झालं. माकडांमध्ये या रोगाशी लढण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती विकसित करण्याचा अर्थ माणसाचीही रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येऊ शकते. म्हणजे आता माकडांच्या शरीरातील अँटीबाॅडी घेऊन नवीन लस तयार केल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच हे अँटीबाॅडी माणसाच्या शरीरातील बॅक्टेरिया आणि विषाणूशी लढू शकतात.
आता चीनच्या वैज्ञानिकांनी माकडांमधील अँटीबाॅडी घेऊन महिन्याभरामध्ये त्याचा माणसावर प्रयोग करण्यात येऊन, ज्या लोकांची या कोरोना संसर्गातून मुक्तता होईल त्यांच्या अँटीबाॅडीज घेऊन चीन लस बनवणार आहे. चीनमध्ये आतापर्यंत ७५ हजाराहून अधिक कोरोना संसर्ग पासून मुक्तता झालीय. अर्थात त्यांची तब्येत नीट झाली असून ,आत त्यांच्या शरीरातील अँटीबाॅडीज घेऊन हि लस विकसित केली जाईल तसेच माकडांचे अँटीबाॅडीज आणि या रोगातून मुक्त झालेल्यांचे अँटीबाॅडीजचं मिश्रण करूनही चीन एक लस विकसित करणार आहे.